Home अहमदनगर शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

Ahmednagar Crime: शिंदे गटाच्या पारनेर तालुकाप्रमुखाविरोधात विनयभंगाचा (Molestaition) गुन्हा भाळवणीत दोन गटांत राडा : परस्पर विरोधी गुन्हे दाखल; पेट्रोल पंपाच्या काचा फोडल्या.

molestation case against the taluka head of the Shinde group

भाळवणी : पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा शांत होत नाही तोच शुक्रवारी रात्री तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भाळवणी येथे दोन गट परस्परात भिडले. या भांडणात शिवसेना शिंदे गटाचे पारनेर तालुकाप्रमुख विकास ऊर्फ बंडू रोहोकले यांच्या पेट्रोल पंपाच्या केबिनच्या काचा फुटल्या असून, त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. भाळवणीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी असलेल्या उमेदवाराशी चर्चा करीत असताना झालेल्या शिवीगाळीतून दोन गट एकमेकांविरोधात भिडले. त्यातून

परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जबरी चोरीचे गुन्हे दोन्ही गटांवर दाखल असून, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पहिली फिर्याद पारनेर पोलिस ठाण्यात विकास रोहोकले यांनी दिली. विकास रोहोकले हे ५ जानेवारीला रात्री ८च्या सुमारास घरून त्यांच्या नगर-कल्याण रस्त्यावरील श्री माउली पेट्रोल पंप येथील ऑफिसमध्ये गेले होते.

ऑफिसमध्ये कामकाज पाहत असताना अविनाश सूर्यकांत रोहोकले पेट्रोल पंपावर आला. पंपावर असलेल्या कर्मचाऱ्याशी तो विनाकारण वाद घालू लागला. त्यापाठोपाठ तेथे दत्तात्रय केरूभाऊ रोहोकले, दीपक भागुजी रोहोकले, सूर्यकांत केरूभाऊ रोहोकले हजर होऊन वाद घालून कर्मचाऱ्यास मारहाण करू लागले. त्यापैकी एकाने तेथे असलेला पेव्हिंग ब्लॉक उचलून कार्यालयाच्या काचेवर फेकून मारल्याने काच फुटली. त्यांनी पंपावर कामास असलेले संदीप पांडुरंग रोहोकले याच्याकडील एक लाख दिलीप पांडुरंग रोहोकले याच्याकडील दोन तोळे सोने घेतले. पंपाची तोडफोड येथील ऑफिसमध्ये गेले होते. करून ते तेथून निघून गेले, असे घनश्याम विकास रोहोकले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दुसरी फिर्याद महिलेने दाखल केली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास विकास भाऊसाहेब रोहोकले दोन पांढऱ्या वाहनांसह महिलेच्या घराजवळ आला. दुसऱ्या वाहनांमध्ये जयसिंग रोहोकले, अक्षय रोहोकले, नामदेव रोहोकले होते. विकासने घरात येऊन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. आरडाओरड केल्यानंतर बाहेर जाताना गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण घेऊन पळून गेला, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

दोन्ही गटांच्या फिर्यादींवरून पारनेर पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जावळे करीत आहेत. दरम्यान, तपासी अधिकारी जावळे यांच्याशी संपर्क साधला असता दोनही गटांचे आरोपी फरार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: molestation case against the taluka head of the Shinde group

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here