अहमदनगर ब्रेकिंग: महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय?
Ahmednagar Suicide News: महिला पोलीस कर्मचारीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, सुसाईड नोट मिळाली असून पोलीस प्रशासन बोलण्यास तयार नाही.
अहमदनगर : महिला पोलीस कर्मचारीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केल्याची घटना समोर आली आहे. अर्चना रावसाहेब कासार असे मयत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अहमदनगर पोलीस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात अर्चना कासार या कार्यरत होत्या. शनिवारी रात्री त्यांची ड्युटी संपवून रविवारी सकाळी त्या अहमदनगर शहरातील बोल्हेगाव उपनगरात असलेल्या घरी गेल्या. मात्र काही वेळानंतर घरातील त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या मुलाला संशय आला. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवून घेऊन दरवाजा उघडला असता अर्चना कासार या गळाफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्या होत्या.
या घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी आणि त्यांच्या पथकाने तातडीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. मात्र त्याआधीच अर्चना कासार मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अर्चना कासार यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर अनुकंप तत्त्वावर त्या जिल्हा पोलीस दलामध्ये भरती झाल्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असून घरगुती कारणातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी दिली आहे. मात्र त्यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट मिळाली असल्याची कुजबूज सुरू असून त्याबाबत पोलीस प्रशासन काही बोलण्यास तयार नाही. या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Ahmednagar female police Constable committed suicide by hanging herself
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App