Home क्राईम संगमनेर: ‘त्या’ आरोपींना पळवून जाताना मदत करणारे आरोपी अटकेत

संगमनेर: ‘त्या’ आरोपींना पळवून जाताना मदत करणारे आरोपी अटकेत

Sangamner News:  कारागृहाचे गज कापून पळून जाणाऱ्या चौघांना मदत करणारे तिघेही संगमनेरातील. (Arrested).

Accused who helped 'those' accused to escape arrested

संगमनेर: संगमनेरातील दुय्यम कारागृहात असलेल्या चार आरोपींनी कारागृहाचे गज कापून चारचाकी वाहनात बसून पसार झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली होती. कारागृहातून पळून गेलेल्या चौघांनाही दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून जेरबंद केले. आता त्यांना पळवून नेण्यास मदत करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.  

कलीम अकबर पठाण, हलीम अकबर पठाण (दोघेही रा. संगमनेर), प्रथमेश राऊत (घुलेवाडी) अशी आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या तिघांची नावे आहेत. पळून जाणाऱ्या आरोपींना चारचाकी वाहन उपलब्ध करून देणे, वाहनाची नंबर प्लेट बदलणे तसेच त्यांच्यासाठी पैशांची व्यवस्था करणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

कारागृहाचे गज कापून पळून जाणाऱ्या चौघांना मदत करणारे तिघेही संगमनेरातील आहेत. त्यांच्यात कारागृहात एकमेकांमध्ये ओळख झाली होती, असेही उपविभागीय पोलिस अधिकारी वाघचौरे यांनी माहिती देताना सांगितले.

हालीम राहुल देविदास काळे, रोशन रमेश ददेल, अनिल छबू ढोले, मच्छिंद्र मनाजी जाधव अशी पळून जाणाऱ्या चार आरोपींची नावे आहेत. ते गंभीर गुन्ह्यांतील आरोपी असून संगमनेर कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना कारागृहातील बराक क्रमांक तीनचे गज कापून ते चारचाकी वाहनात बसून पळून गेले होते.

आरोपी पलायन प्रकरणात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात तो भादंवि कलम २२४ नुसार दाखल आहे. त्यात भादंवि कलम ३०७, १२० ब तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ ची वाढ करण्यात आली आहे. पळून जाणारे चौघे आणि त्यांना मदत करणारे आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.

Web Title: Accused who helped ‘those’ accused to escape arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here