Home अहमदनगर अहमदनगर: लक्ष्मीपूजन करीत असताना फटाक्यांमुळे घराला लागली आग

अहमदनगर: लक्ष्मीपूजन करीत असताना फटाक्यांमुळे घराला लागली आग

Ahmednagar News:  लक्ष्मीपूजन करत असतांना येथील खंडोबा मंदिराच्या शेजारील घराला फटाक्यामुळे आग (Fire) लागल्याची घटना.

house caught fire due to firecrackers while performing Lakshmi Puja

अहमदनगर: रविवारी ऐन दिवाळीच्या दिवशी सावेडी परिसरातील नागरिक लक्ष्मीपूजन करत असतांना येथील खंडोबा मंदिराच्या शेजारील घराला फटाक्यामुळे आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसून अग्निशमन दलाने तातडीने येऊन ही आग आटोक्यात आणली.

रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून फटाक्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. येथील बसपाचे संतोष जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने तत्परता दाखवत लवकर येऊन ही आग त्वरित विझवली यामुळे मोठा अनर्थ टळला.

Web Title: house caught fire due to firecrackers while performing Lakshmi Puja

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here