Home मनोरंजन धक्कादायक! अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची सुसाईड नोट लिहून आठव्या मजल्यावरून उडी...

धक्कादायक! अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची सुसाईड नोट लिहून आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Pune Suicide News:  केतकी माटेगावकरच्या (Ketki Mategaonkar) चुलत भावाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या,  पोलिसांना सापडली सुसाईड नोट.

Actress Ketki Mategaonkar's cousin commits suicide

पुणे: सुसगावमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

अक्षय अमोल माटेगावकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने सिनेमाविश्वात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्याच्या सुसगावमध्ये इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारुन अक्षयने जीवन संपवल. अक्षयने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं होतं. आत्महत्येपूर्वी अक्षयने एका चिठ्ठीत लिहिलं की, मला नोकरी मिळणार नाही. मी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही. मी माझं आयुष्य संपवतोय. या दुर्देवी घटनेने माटेगावकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात शोक व्यक्त होत आहे.

Web Title: Actress Ketki Mategaonkar’s cousin commits suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here