अगस्ती साखर कारखाना निवडणूक रद्ध, आज निर्णय नाही, या तारखेला सुनावणी
Agasti sugar factory Election: उच्च न्यायालयाच्या खंडपीठात शासन निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल निवडणूक संदर्भात अंतिम निर्णय नाही.
अकोले: अतिवृष्टीमुळे सहकारी संस्था निवडणुका (Election) राज्यसरकारने स्थगित केल्या आहेत. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे रविवारी होणारे मतदान रद्द करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णया विरुद्ध शेतकरी समृद्धी मंडळाचे वतीने ज्येष्ठ नेते, अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर, अगस्ति कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रकाशराव मालुंजकर, परबतराव नाईकवाडी, माजी संचालक अशोकराव देशमुख, उमेदवार विकास शेटे आदींनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात शासन निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती.
मात्र त्यासंदर्भात आज कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. यासंदर्भात 25 जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. आता 25 जुलै रोजीच निवडणूक संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
Web Title: Agasti sugar factory election cancelled, no decision today