धक्कादायक! लग्नाचं आमिष दाखवून अभिनेत्रीवर अत्याचार
Mumbai Crime News: लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर अत्याचार (abused) झाल्याची धक्कादायक घटना समोर.
मुंबई: मुंबईत लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील एन. एम. जोशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या अभिनेत्रीने अत्याचार आणि मारहाण प्रकरणी टांझानियाचा रहिवासी असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केल आहे. लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
एका अहवालानुसार, वर्षभरापूर्वी आरोपी आणि अभिनेत्रीची मैत्री झाली. या टांझानियाच्या या व्यक्तीने अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला आहे. अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभिनेत्रीने ही तक्रार दिली आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीने पोलीस योग्य मदत करत नसल्याचा आरोपही केला आहे.
अभिनेत्रीने १३ फेब्रुवारीवारी पासून दोघांमध्ये मैत्रीला सुरुवात केली. त्यानंतर टांझानियाच्या आरोपीने अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर अभिनेत्रीने होकार दिला. त्याचबरोबर दोघांनी त्यांच्या आई-वडिलांनाही माहिती दिली.
अभिनेत्रीने होकार दिल्यानंतर आरोपीने वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला. एकेदिवशी मित्राच्या फार्महाऊसवर नशेत असताना आरोपीने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. आरोपीने अनेकदा इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप अभिनेत्रीने केला आहे.
दरम्यान, आरोपीच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, कलम ३२३, कलम ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून अभिनेत्रीवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Web Title: the actress was abused by the lure of marriage
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App