Home महाराष्ट्र माळशेज घाटात पिकनिक करायला गेले अन शिवसेनेच्या नेत्याची अचानक एक्झिट

माळशेज घाटात पिकनिक करायला गेले अन शिवसेनेच्या नेत्याची अचानक एक्झिट

मित्रपरिवाराच्या सोबत असताना अचानक ह्रदयविकाराचा झटका, अन रुग्णालयात आज मृत्यू (Death).

sudden death of the Shiv Sena leader went for a picnic in Malshej Ghat

वसई: शिवसेना ( शिंदे गट) चे माजी नगरसेवक प्रवीण उर्फ बाळू कांबळी हे ४ ऑगस्ट रोजी माळशेज घाटात पावसाळी पिकनिक करायला गेले होते. मित्रपरिवाराच्या सोबत असताना अचानक ह्रदयविकाराचा झटका (Heart attack)आला. प्रवीण कांबळी यांनी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आज सकाळी सात वाजता त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रवीण हे 1987 साली वयाच्या पंचविशीत एक वृत्तपत्र वितरक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा घेतली. 1990 पासून प्रखर आणि कडवा शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. 1995 साली प्रथम वसई नगरपालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले.

शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप आल्यामुळे प्रवीण कांबळी अखेर शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले. आज त्यांच्या मृत्यूने वसई परिसरावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. मैत्री दिनी दुखद घटना घडल्याने मित्रांवर शोककळा पसरली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: sudden death of the Shiv Sena leader went for a picnic in Malshej Ghat

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here