Home नाशिक अफगाण नागरिकाची गोळ्या झाडून हत्या, हत्येबाबत पोलिसांचा मोठा खुलासा आला समोर

अफगाण नागरिकाची गोळ्या झाडून हत्या, हत्येबाबत पोलिसांचा मोठा खुलासा आला समोर

Afghan civilians shot dead murder

Nashik | नाशिक: नाशिकच्या येवल्यामध्ये झालेल्या अफगणिस्तानातील मुस्लिम हत्येनं खळबळ उडाली आहे. या मुस्लिम नागरीकाची गोळ्या (Firing) घालून हत्या (Murder) करण्यात आली होती. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेनं संपूर्ण नाशिक हादरलं आहे.  

आता या हत्याकांडप्रकरणी ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. आर्थिक व्यवहार आणि पोपटींच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.  ते पत्रकार परिषदेत बोलत होते अहमद चिश्ती असं या अफगाण नागरिकाचं नाव आहे. अहमद चिश्तीच्या ड्रायव्हरनेच त्याचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासही करण्यात सुरुवात केलीय, बाबी जवळ पुजा करुन गाडी बसत असताना अहमद चिश्ती यांच्यावर गोळ्या (Firing) झाडल्या आणि त्यानंतर मारेकरी तेथून पळून गेले.

अफगणा नागरिक अहमद चिश्तीच्या हत्याकाड प्रकरणी तीन आरोपींचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येवल्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गोळ्या झाडल्यानंतर अहमद चिश्ती हा गाडी घेऊन फरार झालाय सध्या त्याचा शोध सुरु आहे.

दरम्यान अहमद चिश्ती हा मूळचा अफगणिस्तानचा नागरीक आहे. तो रेफ्युजी म्हणून राहत होता. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या नावावर प्रॉपर्टी घेतली होती त्यानंतर तो फरार झाला होता अहमद चिश्तीच वय 35 वर्ष होतं रात्रीच्या सुमारास पुजा झाल्यानंतर त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Afghan civilians shot dead murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here