Home नागपूर नोकरी लावण्याच्या बहाण्याने बोलावून बडतर्फ पोलीस शिपायाकडून तरुणीवर अत्याचार

नोकरी लावण्याच्या बहाण्याने बोलावून बडतर्फ पोलीस शिपायाकडून तरुणीवर अत्याचार

sexual abuse of a young woman by a police constable on the pretext of getting a job

Nagapur Crime | नागपूर: नोकरी लावण्याच्या बहाण्याने बडतर्फ पोलीस शिपायाने तरुणीवर अत्याचार (Sexual abuse) केल्याची घटना समोर आली आहे. निलेश योगेश्वर हेडाऊ वय २४ रा. भंडारा याला अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २९ जून रोजी अंबाझरी येथे राहणारी २४ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात बहिणीसह सीताबर्डी येथे आली होती. दोघी बहिणी मोर भवन बसस्थानकावर नोकरीबाबत चर्चा करत होत्या. त्याच्याजवळ नीलेश हेडाऊ उभा होता. त्याने त्यांना आपल्याकडे नौकरी असल्याची बतावणी केली व स्वतःची ओळख हॉटेल मालक, अशी करून दिली. त्याने तरुणीकडून तिचा मोबाइल क्रमांकही घेतला. रविवार, ३ जुलै रोजी नीलेशने तरुणीला फोन करून ‘पारडीत हॉटेल सुरू आहे, त्याच्या मालकाला मुलाखत घ्यायची आहे’, असे सांगून एसटी स्टँडवर बोलावले.

तो तरुणींसह एसटी स्टँडवरून भंडारा येथे जाणाऱ्या बसमध्ये चढला. रात्री ८ वाजता दोघेही पारडी येथील एका ठिकाणी बसमधून उतरले. मुलाखत देण्याच्या बहाण्याने नीलेश तरुणीला एका निर्जन घरात घेऊन गेला. तेथे त्याने मुलीवर जबरदस्ती सुरू केली. मुलीने कशीबशी आपली सुटका केली आणि पळू लागली. या प्रयत्नात ती जखमीही झाली. मात्र, ती परत नीलेशच्या हाती लागला. नीलेशने तिला पुन्हा घरात नेऊन तिच्यावर अत्याचार (Sexual abuse) केला. रात्रभर ओलिस ठेवल्यानंतर नीलेशने तरुणीला एसटी स्टँडजवळ सोडून पळ काढला.

घरी आल्यानंतर मुलीने झालेला प्रकार घरच्यांना सांगितला. जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तरुणीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी नीलेश हेडाऊ असल्याचे निष्पन्न झाले, त्याला अटक करण्यात आली. त्याची पत्नीही त्याच्यापासून वेगळी राहते. अंबाझरी पोलिसांनी नीलेशला ताब्यात घेऊन त्याच्यावर अत्याचार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्याला ७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: sexual abuse of a young woman by a police constable on the pretext of getting a job

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here