Home नांदेड डॉक्टर लेकीला कुटुंबियांनी क्रूरपणे संपवलं; शेतात जाळलं, नांगरणी केली अन्…

डॉक्टर लेकीला कुटुंबियांनी क्रूरपणे संपवलं; शेतात जाळलं, नांगरणी केली अन्…

Nanded Murder Case:  मुलीचं प्रेमप्रकरण समजल्यानंतर तिची हत्या.

After finding out about the girl's love affair, she was murder 

नांदेड: मधून धक्कादायक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इभ्रतीसाठी डॉक्टर मुलीला कुटुंबियांनी संपवल्याची घटना घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे, वडिलांसह भाऊ, मामा, चुलतभाऊ यांनी हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. मुलीचं प्रेमप्रकरण समजल्यानंतर तिची हत्या केली. शेतातच तिचा मृतदेह जाळला, त्यात नांगरणी केली अन् लागवड केली.दोन हजार लोकसंख्येच्या गावाला याचा सुगावाही लागला नाही. पण मुलीच्या मित्रांनी आवाज उठवल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले. या घटनेमुळे नांदेड हादरलं. 22 जानेवारी 2023 रोजी कुटुंबियांनी लेकीला क्रूरपणे संपवलं. अन् 26 जानेवारी रोजी हे हत्याकांड उघडकीस आले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील महीपाल पिंपरी येथे एका डॉक्टर तरुणीची हत्या होते. तिचेच कुटुंबीय तिला घरीच संपवतात. मग आपल्याच शेतात नेऊन तिला जाळून टाकतात. मग त्या शेतामध्ये नांगरणी करुन कांदा लागवड करतात. दोन हजार लोकवस्ती असलेल्या गावाला या घटनेचा सुगावा लागतही नाही? हे कसं काय शक्य आहे? डॉक्टर मुलगी ज्या दिवसापासून बेपत्ता झाली. तेव्हापासून तिच्या वर्गमित्रांना संशय येऊ लागला. ती गेली तरी कुठे? तिचा फोन का लागत नाही? असे प्रश्न त्यांना पडले. अखेर तिच्या एका मैत्रिणीनं थेट जिल्हा पोलीस मुख्यालय गाठलं. तिथल्या महिला सुरक्षा कक्षेकडे तिने तक्रार दिली. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने तपासाची चक्रे फिरली.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

जिल्हा पोलीस मुख्यालयाकडून या घटनेबाबत विचारणा झाल्यानंतर स्थानिक लिंबगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी खडबडून जागे झाले झाले. त्यांनी गावातल्या पोलीस पाटील भारत कदम यांना पाचारण केलं. त्यानंतर सापळा रचला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं. मुलीच्या वडिलांना पहिल्यांदा याबाबत काही माहित नसल्याचं सांगितलं. पण पोलिसी खाक्या दाखवताच वडिलांनी हत्येची कबुली दिली. इतकंच नाही. तर या गुन्ह्यात सामील असलेल्या मुलीचा भाऊ, मामा, चुलतभाऊ यांचीही नावं सांगितली. पोलिसांनी तात्काळ मुलीच्या वडिलांसह पाच जणांवर हत्येचा गुन्हाही दाखल केला. नात्यातील मुलाशी प्रेमसंबध असल्यामुळं ही हत्या (Murder) करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Web Title: After finding out about the girl’s love affair, she was murder

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here