मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मनोज जरांगे ‘ही’ मोहीम घेणार हाती
Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील स्वस्थ बसणार नाही तर नवीन मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी एका सभेत सांगितले आहे.
Manoj Jarange Patil: आता मराठा आरक्षण ओबीसी तून घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यासाठी मुंबई धडक देणार असून आझाद मैदानात 20 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत. मुंबईत शांततेत जायचं अन शांततेत यायचं. कुणी जर धिंगाणा करायला लागला, गाडी पेटवायला लागला, तर जाग्यावर धरून पोलिसांकडे न्यायचं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे. मराठा आमदार खासदार आणि मंत्री यांना हात जोडून विंनती करतो. मराठ्यांच्या पोरांच्या पाठीमागे उभे रहा, नाहीतर मराठ्यांचे घर तुमच्यासाठी बंद राहतील. एकदा जर आम्ही गाव सोडलं तर चर्चा बंद, आम्ही आरक्षण घेऊनच येऊ असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.
आता आरक्षण मिळाल्यानंतरही शांत बसणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतरचा प्लान जरांगे यांनी आज त्यांच्या एका सभेत जाहीर केला आहे. तुम्ही मला दारू पिणाऱ्यांच्या याद्या आणून द्या .मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर दारू पिणाऱ्यांना सरळच करतो असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी तळीरामांना दिला आहे.
गोदाकाठच्या 123 गावांच्या गाठी भेटी दौऱ्यानिमित्त ते घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे ते बोलत होते. रात्रीचे 9 वाजले की मी माझा हात कोणाच्या हातात देत नाही, मला भीतीच वाटते आता. मी त्यांच्या हातात हात दिला तर ते माझा हात सोडतच नाही. मी इकडे ओढतो, तर ते तिकडे ओढतात. आरक्षणाचा विषय संपल्यावर मद्यपीना सरळ करण्याची मोहीम हाती घेणार असून तुम्ही मला याद्या आणून द्या, मी त्यांचा कार्यक्रमच करतो असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. पिण्याच्या वेळेला त्यांच्या जवळ जाऊन मांडीच घालून बसतो. तो बाटली कसा उघडतो तेच बघतो मी असं जरांगे म्हटलेत. आता मला दारू पिणाऱ्या टोळीच्याच मागे लगावे लागेल असे म्हणत जरांगे पाटलांनी आता दुसरी मोहीम हाती घेतली आहे.
Web Title: After getting Maratha reservation, Manoj Jarange will take up this campaign
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News