अहमदनगर ब्रेकिंग! पाण्याच्या टाकीवरून पन्नास फुट खाली पडल्याने मजुराचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: बांधकाम सुरू असताना पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू (Dies) झाल्याची घटना, तोल गेला अन दुर्दैवाने ही घटना घडली.
कोपरगाव | Kopargaon: बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात घडली. ईश्वरचंद भवरलाल मेघवान (वय ३३, रा. चकमिटाई, सीकर, राजस्थान) असे मृत मजुराचे नाव आहे.
कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात अमरधाम शेजारी गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु आहे. ईश्वर मेघवान व विकास नायक हे राजस्थान येथील कामगार येथे काम करीत असतात. नुकतेच ते आपल्या घरून दिवाळी करून कामावर आले होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था बांधकामच्या जवळच केलेली आहे. शनिवारी सकाळी जेवण करून त्यांनी कामाची सुरवात केली. दोघे पाण्याच्या टाकीवर चढले होते. ग्राईंडरने काम चालू होते, तेव्हा ग्राईंडरची वायर वारंवार निघत होती. यावेळी विकास नायक याने इश्वरचंदला पाण्याच्या टाकीवरून खाली पाठविले व वायरवर लक्ष देण्यास सांगितले. पाण्याच्या टाकीच्या एका बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर ईश्वर यास वर बोलावले. बांधकाम साहित्य सरकवत असताना ईश्वरचंदचा तोल गेला व तो जवळपास पन्नास फुटावरून खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
Web Title: Laborer dies after falling fifty feet from water tank
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News