अहमदनगर ब्रेकिंग: खून करून रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ झोपला, पळून जाण्याच्या तयारीत असताना….
Ahmednagar | Kopargaon Murder Case: महिलेची दगडाने ठेचून हत्या करणारा संशियीत रात्रभर मृतदेहाजवळ झोपला.
कोपरगाव: भंगार गोळा करण्याच्या वादातून एका परप्रांतीयाने भिक्षेकरी महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना कोपरगावमधून समोर आली. संशियीत आरोपी रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ झोपून होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
सकाळी रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी मोठ्या ताब्यात घेतले आहे.
नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर शिवारात भिक्षेकरी महिला मयत सोनुकुमारी आणि मूळचा बिहार येथील असणारा संशयित आरोपी निसार खान यांचे भंगार आणि प्लास्टिक बाटल्या गोळा करण्यावरून वाद झाले होते. त्याचाच राग मनात धरून निसार खान याने रात्रीच्या सुमारास सोनुकुमारीची दगडाने ठेचून हत्या केली.
त्यानंतर त्याने मृतदेह एका व्यापारी संकुलातील दुकानासमोर ओढत नेला. ताे बराच वेळ मृतदेहा शेजारी झोपून राहिला. जाग आल्यानंतर तेथून ताे फरार झाला. दरम्यान सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आला असता त्याने मृतदेह पाहिला आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली.
संबंधित संशयित आरोपीचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध सुरू केला. निसार खान रेल्वेने दुसरीकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी काही तासातच मोठ्या शिताफीने त्याला जेरबंद केले.
खान याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलीस वासुदेव देसले (पोलीस निरीक्षक, कोपरगाव) हे करीत आहे.
Web Title: After Murder him, he slept next to her dead body all night