Home अकोले प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या संगमनेर व अकोलेतील दोघांवर गुन्हा दाखल

प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या संगमनेर व अकोलेतील दोघांवर गुन्हा दाखल

Sangamner Crime: कीटकनाशकांचा विनापरवाना बेकायदेशीर साठा करून ती शेतकऱ्यांना विकणाऱ्या दोघा जणांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल.

Crime Filed two people from Sangamner and Akole who were selling banned pesticides

संगमनेर: उत्पादन करणे आणि विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेल्या कीटकनाशकांचा विनापरवाना बेकायदेशीर साठा करून ती शेतकऱ्यांना विकणाऱ्या दोघा जणांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी संगमनेर तालुक्यातील दुसरा आरोपी अकोले तालुक्यातील आहे.

जुन्नर तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी निलेश प्रकाश बुधवंत यांनी दिलेल्या फिर्यादा नुसार पोलिसांनी रवींद्र बबन देशमाने (रा. धांदरफळ, ता. संगमनेर) आणि बापूसाहेब उत्तमराव उगले (रा. डोंगरगाव, तालुका अकोले) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कृषी अधिकाऱ्यांना जुन्नर बस स्थानकाजवळ एका वाहनांमध्ये कीटकनाशके आहेत.

ठेवून त्याची शेतकऱ्यांना विक्री करत असताना हे दोघेजण आढळून आले. त्यांच्याकडे कीटकनाशकांची नोंदणी, उगम प्रमाणपत्र, उत्पादन व विक्रीचा परवाना नसल्याचे चौकशीत आढळून आले. शासन व शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक करत असल्याचे यातून दिसून आल्याने त्यांच्याविरुद्ध बुधवंत यांनी फिर्याद दिली. जुन्नर पोलिसांनी कीटकनाशक कायदा, कीटकनाशक नियम तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये फसवणूक केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोघांकडे बंदी घातलेले सुमारे २ लाख ५४ हजार २९० रुपये किमतीची कीटकनाशके आढळून आली.

Web Title: Crime Filed two people from Sangamner and Akole who were selling banned pesticides

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here