Home जळगाव विवाहितेवर अत्याचार, अश्लील फोटो काढल्याने मित्रानेदेखील केला बलात्कार

विवाहितेवर अत्याचार, अश्लील फोटो काढल्याने मित्रानेदेखील केला बलात्कार

Rape Case:  विवाहीतेशी ओळख वाढवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. एवढेच नाही तर तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो (अश्लील, Porn) फोटो काढून मित्राला पाठविण्यात आल्याने व्हायरल करण्याची धमकी देत मित्रानेदेखील तिच्यावर अत्याचार.

A friend also rape a married woman for taking porn photos

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेती व घरकाम करणाऱ्या विवाहीतेशी ओळख वाढवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध (Sexually abused) प्रस्थापित करण्यात आले. एवढेच नाही तर तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो (अश्लील) फोटो काढून मित्राला पाठविण्यात आल्याने व्हायरल करण्याची धमकी देत मित्रानेदेखील तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.

पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती शेती व मिळेल ते घरकाम करून उदरनिर्वाह चालवते. तिचा पती इलेक्ट्रिक व शेतीची कामे करतो. दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. विवाहितेच्या पतीने शहरातीलच दीपक कंखरे यांच्याकडे इलेक्ट्रिकचे काम केल्याने त्याची ओळख झाली होती, त्यातून मैत्री वाढली. दीपक हा पीडित विवाहितेच्या घरी दूधही देत असल्याने त्याच्याशी ओळखी झाली. काही वेळा मोबाईलवर संभाषणही झाले.

ऑगस्ट २०२१ मध्ये पती घरी नसताना दीपक कंखरे याने पीडिताला फोन केला. परंतु ती फोन उचलत नसल्याने दीपकने अज्ञाताला पीडिताकडे पाठवले व दीपकचे फोन उचलले नाही तर ‘तुझ्या अंगावर अँसिड टाकू, दीपकचे फोन उचल’ असे धमकावल्याने पीडिताने दीपकचा फोन उचलला. त्याने व्हिडिओ कॉल केला व त्या संभाषणाचे रेकॉर्डिंग केले. घरी येऊन धमकावत इच्छेविरुद्ध दोन-तीन वेळा अत्याचार केले. अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढले. मोबाईल स्क्रीन शॉट वरून घेतलेले पीडिताचे फोटो दीपकने मित्र सागर परदेशीला पाठवले.

सागरने देखील पिडितेस घरगुती कामासाठी घरी बोलावत दीपकने पाठवलेले फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी देत पीडिताच्या इच्छेविरुद्ध एकवेळा अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर बाहेरगावी असलेल्या मुलाला ठार मारण्याची धमकीही पिडीतेला देण्यात आली. पीडिताच्या आईला याबाबत माहिती देऊन काही फोटो दाखवण्यात आले. तेव्हा पीडित विवाहितेच्या पतीने सागर परदेशीला घरी बोलावत फोटोबाबत विचारले असता त्याने हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. पीडिताने या प्रकाराला व धमक्यांना कंटाळून पाचोरा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दीपक कंखरे, सागर परदेशी व पीडित विवाहितेकडे अॅसिडचा कॅन घेऊन जाऊन धमकी देणारा अनोळखी अशा तिघांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल केला. दीपक व सागर या दोघांना अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे तपास करीत आहेत.

Web Title: A friend also rape a married woman for taking porn photos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here