Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात याठिकाणी साडे सहा कोटीचा दुध पावडर साठा पकडल्याने खळबळ

अहमदनगर जिल्ह्यात याठिकाणी साडे सहा कोटीचा दुध पावडर साठा पकडल्याने खळबळ

Ahmednagar | Shrirampur: रांजणखोल परिसरात ६ कोटी ५० लाख रुपयांचा दुध पावडर साठा अन्न व औषध प्रशासनाने पकडल्याची कारवाई.

stir after the milk powder stock worth six and a half crores was caught here

श्रीरामपूर: शहरालगत असलेल्या रांजणखोल परिसरात ६ कोटी ५० लाख रुपयांचा दुध पावडर साठा अन्न व औषध प्रशासनाने पकडल्याची कारवाई केली आहे.

एका छोट्या गावात साडेसहा कोटींचा दुध पावडर साठा पकडल्याने खळबळ उडाली असून ही पावडर नेमकी कशासाठी वापरली जायची? तीचा दुधात भेसळीसाठी वापर केला जायचा का? अशी उलट सुलट चर्चा सुरु आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

रांजनखोल, ता. राहता जि. अहमदनगर या ठिकाणी विनापरवाना साठविलेला मोठा दूध पावडर व व्हे पावडरचा साठा असल्याची माहिती मिल्याने अन्न व औषधं प्रशासन मार्फत कारवाई करून हा साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करीत असल्यामुळे सदर कारवाई घेण्यात आली.

दरम्यान कार्यवाही दरम्यान कंपनीच्या वतीने हजर झालेल्या अधिकाऱ्यांनी सदर साठ्याबाबत कोणताही समाधानकारक खुलासा केला नाही अथवा कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. सदर कारवाई अन्न व औषधं प्रशासन, नगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी सहाय्यक आयुक्त प्रमोद काकडे, अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार व नमुना सहाय्यक अधिकारी प्रसाद कसबेकर यांचेसमवेत केली. अन्न नमुने अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: stir after the milk powder stock worth six and a half crores was caught here

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here