Home महाराष्ट्र दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, मुलाच्या निधनाने वडिलांचाही हृद्यविकाराने मृत्यू

दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, मुलाच्या निधनाने वडिलांचाही हृद्यविकाराने मृत्यू

Virar Dies News: हृदयविकाराचा झटका आल्याने पिता पुत्रांचे रुग्णालयात नेण्याअगोदरच मृत्यू.

Youth dies while playing Dandiya, father also dies of heart attack 

विरार: विरारमध्ये दांडिया खेळत असताना ३५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आल्याने पिता पुत्रांचे रुग्णालयात नेण्याअगोदरच मृत्यू झाला. जैन कुटुंबांचा सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मयत मनीष जैन ज्याचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील एव्हरशाईन अवेन्यू या इमारतीमध्ये नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्‍यान शनिवारी रात्री दांडिया सुरू असताना मनीष जैन (वय ३५) या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्याचे वडील नरपत जैन आणि भाऊ त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र रिक्षामध्येच मनीष जैन याचा मृत्यू झाला.

मुलाचा मृत्यू झाल्याचे बघताच त्याचे वडील नरपत जैन (वय ६५) यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Youth dies while playing Dandiya, father also dies of heart attack 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here