संगमनेर: पुन्हा वाळूचे वाहन पकडले, चालक वाहन व वाळू जागेवरच सोडून पसार
Breaking News | Sangamner: अज्ञात चालक वाहन व वाळू जागेवरच सोडून पसार, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; अज्ञातावर गुन्हा दाखल.
संगमनेर: वारंवार कारवाया करुनही वाळूतस्कर काही थांबण्याचे नाव घेईना. संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने बुधवार दि. २८ फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील ध्रुव ग्लोबल स्कूलजवळ वाळूचे वाहन पकडले. मात्र, चालक वाहनासह वाळू सोडून पसार झाला.
याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, तालुका पोलिसांचे पथक गस्तीवर असताना कोल्हार घोटी राज्यमार्गावरील ध्रुव ग्लोबल स्कूलजवळ पिकअपमधून (क्र. एमएच. १५, एजी. ५२४) वाळू वाहतूक करताना निदर्शनास आले. सदर वाहन पकडले असता अज्ञात चालक वाहन व वाळू जागेवरच सोडून पसार झाला. पोलिसांनी या कारवाईत १ लाख ५० हजारांची पिकअप आणि पाच हजार रुपयांची अर्धा ब्रास वाळू असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोकॉ. बाबासाहेब शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चालक व मालकावर गुरनं. १०९/२०२४ भादंवि कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. अमित महाजन करत आहेत.
Web Title: Again the sand vehicle was caught, the driver left the vehicle and the sand on the spot
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study