Home अहमदनगर अहमदनगर: ग्रामसेवकासह प्राध्यापक लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर: ग्रामसेवकासह प्राध्यापक लाचेच्या जाळ्यात

Breaking News | Ahmednagar: विहिर खोदाईचा प्रस्ताव मंजूर करण्याकरीता लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेवक व प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.

Gram sevak along with professor in bribery net

नगर : महात्मा गांषधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत विहिर खोदाईचा प्रस्ताव मंजूर करण्याकरीता लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेवक व प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जामखेड तालुक्यात हा प्रकार घडला.

नेताजी शिवाजी भाबड असे ग्रामसेवकाचे तर शामराव माणिकराव बारस्कर असे गुन्हा दाखल झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे वाघा येथे गट नंबर ११४ मध्ये सुमारे दोन हेक्टर जमीन आहे. या क्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक जलसिंचन विहीर खोदण्याचा प्रस्ताव तक्रारदाराने ग्रामपंचायत वाघा येथे दिला होता. विहीर खोदण्याचा प्रस्ताव मंजूर करून पंचायत समिती जामखेड येथे पाठवण्याकरिता ग्रामसेवक भाबड व खासगी व्यक्ती प्राध्यापक बारस्कर हे लाच मागणी करत असल्याची तक्रार २२ फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती.

लाच मागणी पडताळणी दरम्यान ग्रामसेवक भाबड आणि प्राध्यापक बारस्कर या दोघांनी तक्रारदाराकडे पंचांसमक्ष १५ हजाराची लाच मागणी केली. ही लाच ग्रामसेवकाने प्राध्यपाकाकडे देण्यास सांगितले. बुधवारी बारस्कर यास लाच घेताना रंगेहात पकडले. ग्रामसेवक भाबड व प्राध्यापक बारस्कर यांच्याविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Gram sevak along with professor in bribery net

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here