अगस्तीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी धरणे आंदोलन करणार
कोतूळ | Akole: कोतूळ येथील शेतकरी मेळाव्यात जेष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत व राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे यांनी अगस्ती साखर कारखान्यातील कारभाराची चौकशी व्हावी, बेकायदेशीर कर्जाची चौकशी व्हावी यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून साखर आयुक्तालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी मेळाव्यात माजी मंत्री व अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्यावर टीका केली आहे. या कार्यक्रमप्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे अनुपस्थित होते. यावेळी सावंत म्हणाले जनतेने दिलेल्या खुर्चीच्या जोरावर त्यांनी पद व सत्तेचा वापर स्वतः च्या फायद्यासाठी केला. अकोलेतील जनतेशी गद्दारी करणाऱ्याना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. अगस्ती आपली खाजगी मालमत्ता समजणाऱ्याचे चमचे अगस्ती बचाव कृती समिती विषयी संभ्रम निर्माण करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मेळाव्यात माजी मंत्री व अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कारभाराची चौकशी व्हावी, बेकायदेशीर कर्जाची चौकशी व्हावी यासाठी १५ नोव्हेंबरला पुण्यात साखर संकुलसमोर धरणे आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
यावेळी बी. कजे. देशमुख, बाळासाहेब देशमुख, मारुती लांडे, सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, संदीप महाले, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख आदी उपस्थित होते.
Web Title: agitate to inquire into Agasti sugar Factory Akole