अहमदनगर जिल्हा रुग्णालय अग्निकांड मृत्यूची संख्यात झाली वाढ
अहमदनगर | Ahmednagar: जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत जखमी असलेल्या एका रूग्णाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला आहे.
लक्ष्मण आश्राजी सावळकर (वय- ६० रा. बोधेगाव ता. शेवगाव) असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या १२ वर पोहोचली आहे.
६ नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर सहा रूग्ण जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. यातील शेवगाव येथील लक्ष्मण आश्राजी सावळकर आज सकाळी मृत्यू झाला आहे. आग लागली त्यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोना रूग्णांवर उपचार सुरू होते.
Web Title: Ahmednagar District Hospital fire death toll rises