Home अकोले अकोलेत भाजपकडून महाविकास आघाडीचा निषेध आंदोलन

अकोलेत भाजपकडून महाविकास आघाडीचा निषेध आंदोलन

agitation of Mahavikas Aghadi from BJP in Akole

अकोले | Akole:  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना जाणीवपूर्वक आकस बुद्धीने राज्यातील ठाकरे सरकारने कायद्याचा दुरुपयोग करुन असंवैधानिक पद्धतीने अटक केली. हि तालिबानी राजवट आहे का असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी केला आहे.

राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी अकोले तालुक्याच्या वतीने महाभकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले त्यावेळी भांगरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद चे गटनेते जालिंदर वाकचौरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, सरचिटणीस यशवंत अभाळे, सोशल मिडिया सेलचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, अड भाऊसाहेब गोडसे, अड दिपक शेटे, ओबीसी आघाडी अध्यक्ष किशोर काळे, प्रसन्न धोंगडे, शिवाजी उंबरे, ज्ञानेश पुंडे, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पारासुर, युवा सरचिटणीस सुशांत वाकचौरे, मनोज वावळे, सौरभ देशमुख, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.

श्री. भांगरे यांनी सांगितले की, अतिशय साधे कलम असणारे गुन्ह्यासाठी एवढा गाजावाजा करीत राणे यांच्या अटकेची घाई केली. तेवढी तत्परता या सरकारने जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं मारहाण प्रकरण असो वा राठोड यांचे वरील मुलीच्या आत्महत्या घटना असो, शर्जील उस्मानी मोकाट हिंडत आहे, पालघर च्या साधू हत्याकांड प्रकरणात शेपटी घालून बसले मात्र राणे च्या विरोधात लगेच कार्यवाही केली. एवढी तत्परता राज्य कारभार करताना कोरोना मुक्ती साठी आरोग्य सुविधा उपलब्धता साठी दाखवली नाही असा टोला ही त्यांनी लगावला. जिप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.

भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांनी राज्यात दररोज महिला वर अत्याचार होत असताना हे सरकार डोळे झाकून कामं करते. मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात झापड मारतो असे बोलतात तेव्हा त्यांचेवर काय कारवाई करणार असा सवाल केला.

युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख यांनी सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या सरकारचा निषेध करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

महाभकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, उद्धव सरकार हाय हाय अश्या घोषणा देत सरकारचा निषेध केला. यावेळी प्रभारी तहसीलदार महाले यांनी निवेदन स्वीकारले.

Web Title: agitation of Mahavikas Aghadi from BJP in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here