Home Accident News लग्नासाठी चाललेल्या पती पत्नीच्या दुचाकीला आयशर टेम्पोची धडक, पत्नी ठार पती जखमी

लग्नासाठी चाललेल्या पती पत्नीच्या दुचाकीला आयशर टेम्पोची धडक, पत्नी ठार पती जखमी

Ahemdnagar Accident Eicher Tempo hits wife's two-wheeler

अहमदनगर | Accident:  लग्नासाठी चाललेल्या पती पत्नीच्या दुचाकीला आयशर टेम्पोने धडक दिल्याने अपघात (Accident) घडला. या अपघातात पत्नी जागीच ठार झाली आहे तर  पती जखमी झाले आहे. यशोदा मच्छिंद्र शिरोळे (वय ५३ रा. मातापूर ता. श्रीरामपूर) असे मयत पत्नीचे नाव आहे. त्यांचे पती मच्छिंद्र शिरोळे जखमी झाले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी अहमदनगर-पुणे महामार्गावरील केडगाव शिवारात हा अपघात झाला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अंमलदार गणेश धोत्रे यांनी दिली.

 मच्छिंद्र शिरोळे हे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक असून शिरोळे पती-पत्नी केडगाव येथे जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी मातापूर, ता. श्रीरामपूर येथून आले होते. दुचाकीवरून जात असताना केडगाव शिवारात त्यांच्या दुचाकीला आयशर टेम्पोने धडक दिली.

या अपघातात यशोदा यांचा  मृत्यू झाला. तर मच्छिंद्र शिरोळे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना अहमदनगर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

Web Title: Ahemdnagar Accident Eicher Tempo hits wife’s two-wheeler

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here