Home अहमदनगर धक्कादायक अहमदनगरमध्ये: स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

धक्कादायक अहमदनगरमध्ये: स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Ahmednagar Crime News Harassment of a minor girl identified on Snapchat

अहमदनगर | Ahmednagar Crime News: सोशल मेडियाच्या माध्यमातून स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग (molestation) केल्याची अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला नगर पोलिसांनी अवघ्या तीनच तासांतच जेरबंद केले आहे.

स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीसोबत ओळख केली होती. अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या गॅलरीमध्ये उभी होती. त्यावेळी आरोपीने मुलीला उद्देशून हातवारे केले आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने मुलगी क्लासला जात असताना तिचा पाठलाग सुरू केला होता.

यावेळी त्याने, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू सोबत आली नाहीस, तर तुझ्या कुटुंबाला जीवे ठार मारेन अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी गिरीष सुनिल वरकड याला अवघ्या तीन तासांच्या आत अटक केली असून, याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar Crime News Harassment of a minor girl identified on Snapchat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here