Home महाराष्ट्र Omicron चिंता वाढली; राज्यात ओमायक्रॉन बाधित सात रुग्णांची वाढ

Omicron चिंता वाढली; राज्यात ओमायक्रॉन बाधित सात रुग्णांची वाढ

Omicron Cases In Maharashtra seven Patient new

Omicron Cases In Maharashtra :  दिवसभरात राज्यात ओमायक्रॉनचे सात  रुग्ण आढळून आल्याने राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ४  तर मुंबईत ३  रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाची संख्या 17 झाली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आज आणखी चार रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. हे चारही रुग्ण नायजेरियाहून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे शहराचा ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १० झाला आहे. शुक्रवारी पिंपरीतील चार ओमायक्रॉनचे रुग्ण निगेटिव्ह आले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र, या संपर्कातील चार रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनच्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 22 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज नव्या सात ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील तीन तर पिंपरी चिंचवडमधील चार रुग्णांचा समावेश आहे. मुंबईत आढळलेले तीन रुग्ण हे 48, 25 आणि 37 वर्षांचे आहेत. हे रुग्णांनी टांझानिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशातून प्रवास केलाय.

राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाची संख्या 17 पोहोचली आहे. तर देशातील संख्या ३२ वर आहे.

Web Title: Omicron Cases In Maharashtra seven Patient new

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here