Home अहमदनगर रिक्षात आढळले १ किलो सोने, एकास अटक

रिक्षात आढळले १ किलो सोने, एकास अटक

Ahmednagar 1 kg gold found in rickshaw one arrested

अहमदनगर | Ahmednagar: शहरात एका रिक्षामधून १ किलो सोने संशयास्पद घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या सोन्याची किंमत ५६ लाख ८९ हजार ६९० रुपये इतकी आहे. याप्रकरणी फैरोज रफिक पठाण रा. बाबा बंगाली नगर याला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बंगाली परिसरात कोतवाली पोलिसांचे पथक गस्त घालत असताना संशयास्पद रिक्षा आढळून आली. या रिक्षाचालकास थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जाऊ लागला. पोलिसांना संशय आल्याने रिक्षा चालकास पकडले. रिक्षाची तपासणी केली असता रिक्षामध्ये १ किलो ३६८ ग्राम सोने आढळून आले. त्याला नाव विचारले असता त्याने फैरोज पठान असे सांगितले. सोनेबाबत चौकशी केली असता त्याला ठोस अशी माहिती व पुरावे देता आले नाही.

कोतवाली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Ahmednagar 1 kg gold found in rickshaw one arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here