Home अहमदनगर भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करतय: जयंत पाटील

भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करतय: जयंत पाटील

BJP is doing politics in everything Jayant Patil 

अहमदनगर: राज्यामधील सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्यात आली आहे. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर त्यावर श्रेय घेण्याचे प्रकार सुरु झालेत.

भाजपने बऱ्याच ठिकाणी आनंद उत्सव साजरे केलेत. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. नगरमध्ये बोलताना जयंत पाटील म्हणाले भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करतंय. तसेच मंदिर उघडण्याचे श्रेय हे भाजपाला जाउच शकत नाही. तर संपूर्ण श्रेय हे मुख्यमंत्री व राज्यसरकारचे आहे. असे ते म्हणाले.

लॉकडाऊन काळात बंद करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिले होते. देशात आजही करोना आहे. राज्यातही अनेक ठिकाणी करोना रुग्ण आहेत. रुग्ण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे हळूहळू एक एक गोष्ट सुरु करायची रुग्ण संख्या वाढू द्यायची नाही. असा आमचा प्रयत्न आहे. मात्र भाजपाला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे आहे. राज्यात करोना कसा कमी होईल यासाठी प्रयत्न करायचे आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. मात्र भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत आहे असे ते म्हणाले.   

Web Title: BJP is doing politics in everything Jayant Patil 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here