अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवशी एक हजार पार बाधित
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात काल सायंकाळी ६ वाजेपासून ते आज बुधवार सायंकाळी ६ वाजेपर्यंत रुग्ण संख्या १०३८ ने वाढ झाली आहे. यामुळे सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार १०० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १४०, खासगी प्रयोगशाळेतून ५३४ तर अॅटीजेन चाचणीत ३६४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १४० रुग्ण यामध्ये मनपा ४८, अकोले ८, जामखेड १७, कर्जत १, कोपरगाव ५, नगर ग्रामीण १९, पारनेर ४, पाथर्डी १, राहता ५, संगमनेर ६, शेवगाव ८, श्रीगोंदा २, कॅन्टोनमेंट १, मिलिटरी हॉस्पिटल १४, इतर जिल्हा १ असे बाधित आढळून आले आहेत.
खासगी प्रयोगशाळेत ५३४ रुग्ण बाधित यामध्ये मनपा १३५, अकोले ३१, जामखेड ५, कर्जत २, कोपरगाव ९, नगर ग्रामीण ५७, नेवासा २५, पारनेर १८, पाथर्डी ९, राहता ५०, राहुरी ३५, संगमनेर ११०, शेवगाव १९, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १७ असे बाधित आढळून आले आहेत.
अॅटीजेन चाचणीत ३६४ रुग्ण बाधित यामध्ये मनपा ४४, अकोले ५, जामखेड २०, कर्जत २६, कोपरगाव १२, नगर ग्रामीण १९, नेवासा २२, पारनेर ११, पाथर्डी ३२, राहता ३७, राहुरी ३६, संगमनेर ३७, शेवगाव १०, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर ३०, कॅन्टोनमेंट २ असे बाधित आढळून आले आहेत. जिल्हातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४८ हजार ३४७ इतकी झाली आहे. एकूण मृत्यू संख्या ७५० झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar 1038 corona infected today