Home अकोले Akole: अकोले तालुक्यात ९ करोनाबाधित २५ वा मृत्यू

Akole: अकोले तालुक्यात ९ करोनाबाधित २५ वा मृत्यू

Akole Taluka 9 corona infected one death 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात घेण्यात येणाऱ्या चाचणीत ९ व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे तालुक्याची बाधितांची संख्या १७५८ वर पोहोचली आहे.

अकोले तालुक्यात सलग दोन दिवसांत दोन बळी करोनाने घेतले आहेत. मंगळवारी मवेशी येथील ८२ वर्षीय वृद्धाचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर आज सकाळीच देवठाण येथील ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू करोनाने घेतला आहे. तालुक्यातील करोनाबाधित मृत्यूची संख्या २५ झाली आहे.  

आज बाधित यामध्ये बेलापूर येथील ४० वर्षीय पुरुष, ६८ वर्षीय महिला, ७५ वर्षीय पुरुष, २२ वर्षीय तरुण, राजूर येथील ३२ वर्षीय महिला, शेकईवाडी येथे ७५ वर्षीय पुरुष तर खासगी प्रयोगशाळेत कोतूळ येथील ५१ वर्षीय पुरुष,परखतपूर येथील ४३ वर्षीय पुरुष, गणोरे येथे २३ वर्षीय पुरुष असे आज ९ बाधित आढळून आले आहेत.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Akole Taluka 9 corona infected one death 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here