Home अहमदनगर Accident | अहमदनगर: कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह ४ ठार

Accident | अहमदनगर: कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह ४ ठार

Ahmednagar 4 killed in car accident

Ahmednagar | अहमदनगर: अहमदनगर रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास धामणगाव जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्ड्यात गेल्याने भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात बीड शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक टेकवानी कुटुंबातील तीन भाऊ व एक तरून असे चौघे जागीच ठार झाले तर २० वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात गाडीमधील शंकर शेठ टेकवानी, त्यांचे बंधू सुनील टेकवानी, शंकर टेकवानीतर पुतण्या लखन महेश टेकवानी, सर्व रा. कारंजा बीड यांचा मृत्यू झाला. गाडीमधील शंकर यांचा मुलगा नीरज हा मात्र थोडक्यात बचावला.

बीड शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक शंकर शेठ टेकवानी काही कामानिमित्त दोन भाऊ व दोन पुतणे असे पाच जण क्रेटा कारने बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरून नगरला जाण्यासाठी निघाले भरधाव वेगातील गाडी रात्री दहा वाजेच्या सुमारास नगर रस्त्यावरील धामणगाव गावाजवळ आले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला खोल खड्ड्यात जाऊन आदळली.

Web Title: Ahmednagar 4 killed in car accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here