Home अमरावती धक्कादायक! पोलीस मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक! पोलीस मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Suicide of a police officer by jumping from the fourth floor of the police headquarters

Amaravati | अमरावती : अमरावती जिल्ह्यात एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन  आत्महत्या (Suicide) केल्याची घटना ताजी असताना, आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बाळकृष्ण राठोड (वय 50) असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.  

राठोड यांनी पोलीस मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अमरावतीत गेल्या दोन  दिवसांत 2  पोलिसांनी अचानक आत्महत्या केल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळकृष्ण राठोड हे दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत होते. गुरूवारी (12 मे) सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यास हजर झाले होते. मात्र अचानक त्यांनी पोलीस पोलीस मुख्यालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. यामध्ये राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

राठोड यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही.  त्यांचा मृतदेह दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी दर्यापूर करीत आहे. या दोन घटनेने खळबळ उडाली आहे. 

Web Title: Suicide of a police officer by jumping from the fourth floor of the police headquarters

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here