अहमदनगर जिल्ह्यात सध्या २ हजार ३३२ रुग्णांवर उपचार सुरु
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज केवळ २ हजार ३३२ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आह तब्बल ९५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात ४८ हजार २१५ रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने आणि बाधित रुग्ण संख्या कमी झाल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यातील बरे होण्याचे प्रमाण ९३.९३ टक्के इतके झाले आहे.
आज बरे झालेल्या रुग्णांत मनपा १८३, अकोले ५६, कर्जत ३४, जामखेड ३२, कोपरगाव ३०, नगर ग्रामीण ५८, नेवासा ४५, पारनेर २५, पाथर्डी ४५, राहता ८२, राहुरी ७२, संगमनेर १८१, शेवगाव १८, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ४८, कॅन्टोनमेंट ३, मिलिटरी हॉस्पिटल १६,इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar 958 corona patient discharge