Loni: लोणीतील सराफ लुटीतील आरोपींना अटक
लोणी | Loni: राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील पिंपरी निर्मळ रस्त्यालगत संतोष मधुकर कुलथे यांचे कुलथे ज्वेलर्स या दुकानावर गुरुवारी संध्याकाळी मोटारीच्या काचा फोडून सोने चांदीची लुट करण्यात आली होती. या लुटीतील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. २१ किलो चांदी व ४ तोळे सोने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात करण्यात आली.
नवनाथ साहेबराव गोर्डे वय ३२ रा. सावळीविहीर ता. राहता यांच्या सहकार्याने बरोबर घेत लुट केल्याचे निष्पन्न झाले आहे. अतुल चंद्रकांत आमले वय २४ कर्वेनगर ता. पुणे, सागर गोरख मांजरे ता. श्रीरामपूर, प्रवीण नानासाहेब वाघमारे वय २४ रा. पिंपळस ता. राहता यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Arrest of accused in the looting of Saraf in Loni