Home अहमदनगर कारमध्ये तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार

कारमध्ये तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार

Ahmednagar a young woman was drugged and raped in Car

अहमदनगर | Ahmednagar: एका २८ वर्षीय तरुणीशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखविण्यात आले. नंतर नगर येथे तारकपूर डेपोजवळ बोलावून तेथून कारमध्ये नेऊन थंड पेयात गुंगीकारक औषध टाकून गुंगलेल्या तरुणीवर कारमध्ये एकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

आरोपी सुयश उत्तम भोर याने कारमध्ये बलात्कार केला. तसेच मोबाईलमध्ये व्हिडियो शुटींग ते प्रसारित करण्याची धमकी देत पुन्हा नगरपासून औरंगाबाद रोडवर नेऊन कार बाजूला थांबवून कारमध्ये इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला. या तरुणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या सोबतच मित्र स्वराज याने मदत करत तरुणीस मारहाण केली.

तसेच औरंगाबाद रोडवर प्रसाद कर्डिले याच्या राहत्या घरात नेऊन तेथे अत्याचार करण्यात आला. तिच्या बहिणीचे लग्न मोडण्याची धमकी दिली. विडीयो प्रसारित करण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या तरुणीने त्रासाला कंटाळून ५० हजार रुपये दिले.

याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी सुयश उत्तम भोर, स्वराज यामाळे पाईपलाईन रोड नगर, प्रसाद कर्डिले रा. नेवासा, हितेश चौधरी, सरस्वती उत्तम भोर यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाने पालक वर्गात खळबळ उडाली आहे.  

Web Title: Ahmednagar a young woman was drugged and raped in Car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here