Home संगमनेर संगमनेर: बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर पोलिसांच्या ताब्यात

संगमनेर: बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर पोलिसांच्या ताब्यात

Sangamner Dumper transporting illegal sand in police custody

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांचे सत्र सुरूच आहे. पोलीस त्यांच्यावर कारवाई करतच आहे मात्र पोलिसांच्या नजरे आडून बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरूच असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

मुळा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणारा डंपर घारगाव पोलिसांनी पकडला असून एका व्यक्तीविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १५ लाख रुपयांचा डंपर व २० हजार रुपयांची वाळू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक हरीशचंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत पोपट साबळे रा. अकलापूर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी मध्यरात्री मुळा नदीपात्रातून विना परवाना वाळू उपसा करून तिची वाहतूक करणारा डंपर एम.एच. १४ इएम ४६४२ हा घारगाव पोलिसांनी घारगाव शिवारात पकडला आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू खेडकर अधिक तपास करीत आहेत.   

Web Title: Sangamner Dumper transporting illegal sand in police custody

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here