Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात पुन्हा ३६ व्यक्ती करोनाबाधित

Sangamner: संगमनेर तालुक्यात पुन्हा ३६ व्यक्ती करोनाबाधित

Sangamner Taluka another 36 corona Positive

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बुधवारी ३६ व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ५ हजार ८८३ वर पोहोचली आहे.

बुधवारी खासगी प्रयोगशाळेतून ९, शासकीय प्रयोगशाळेतून ४ तर अँटीजेन चाचणीत २३ जण बाधित आढळून आले आहेत. शहरात १३ जण तर ग्रामीण भागात २३ जण बाधित आढळून आले आहेत.

शहरातील घोडेकरमळा येथे तब्बल ७ जण बाधित आढळून आले आहेत. सुकेवाडी रोड येथे  १, कुंभार गल्ली २, गणेशनगर २, भारतनगर १ असे १३ जण बाधित आढळून आले आहेत.

तर ग्रामीण भागातून रहिमपूर, आश्वी बुद्रुक, मंगळापूर, निमज, कोकणगाव,खळी, चिंचपूर, रायतेवाडी, घुलेवाडी, गुंजाळवाडी, राजापूर अकलापूर मांडवे बुद्रुक या गावांत २३ बाधित आढळून आले आहेत.  करोणाचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव अजून सुरूच आहे. नागरिकांनी सतर्क राहून करोनाबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. तालुक्यात मृत्यूदर घटला असला तरी बाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे.  

Web Title: Sangamner Taluka another 36 corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here