Home संगमनेर संगमनेर तालुक्यात आज गुरुवारी इतके करोना बाधित

संगमनेर तालुक्यात आज गुरुवारी इतके करोना बाधित

Sangamner Taluka Today corona infected patient

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज गुरुवारी १७ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ५ हजार ८९८ वर पोहोचली आहे.

आज शहरात तीन तर ग्रामीण भागात १४ जण बाधित आढळून आले आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालात शहरी भागात गणेशनगर येथे ४७ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ५८ वर्षीय महिला,  ३६ वर्षीय महिला असे तीन जण बाधित आढळून आले आहेत.  

तर ग्रामीण भागात मोधळवाडी येथे ४० वर्षीय तरुण, आंबी खालसा येथे ३० वर्षीय पुरुष, चिंचपूर येथे ८० वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे ५४ वर्षीय महिला, प्रतापपूर येथे ७० वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर गुंजाळवाडी येथे ५० वर्षीय पुरुष व ४५ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ६० वर्षीय पुरुष,  घुलेवाडी येथे १३ व ६० वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, अकलापूर येथे ५८ वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा येथे ३५ वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे ७७ वर्षीय पुरुष असे १७ जण बाधित आढळून आले आहेत.  

Web Title: Sangamner Taluka Today corona infected patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here