Home Accident News गोव्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला अपघात: महिला ठार तर ५ जण जखमी

गोव्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला अपघात: महिला ठार तर ५ जण जखमी

Ahmednagar Accident News two Cars

अहमदनगर | Ahmednagar Accident News | Shrigonda: श्रीगोंदे तालुक्यात दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजता घडली.  या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर पाच जण जखमी झाले आहेत. नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव फाटा हा अपघात झाला. मयत महिला ही हिमाचल प्रदेश येथील असल्याचे समजते.

हिमाचल प्रदेश येथील पती-पत्नी आपल्या दोन मुलांसह गोवा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांची कार सकाळी आठच्या सुमारास पारगाव फाटानजीक आली असता, त्यांच्या गाडीची व बारामतीवरून नगरच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरात धडक झाली. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना श्रीगोंदा व दौंड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातातील मयत व जखमींची नावे अद्याप समजू शकली नाही.

Web Title: Ahmednagar Accident News two Cars

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here