Home क्राईम संगमनेर: विवाहितेला आपण पळून जाऊन लग्न करू असे म्हणत विनयभंग, तरुणास अटक

संगमनेर: विवाहितेला आपण पळून जाऊन लग्न करू असे म्हणत विनयभंग, तरुणास अटक

Sangamner Crime News married woman to run away and get married

Ahmednagar News Live | संगमनेर | Sangamner Crime News: एका तरुण २४ वर्षीय विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग करणाऱ्या २२ वर्षीय तरूणाविरुद्ध विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तसेच गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील एका उपनगरात घडला. याप्रकरणी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संकेत कैलास यादव वय २२ रा. आश्वी ता. संगमनेर असे या तरुणाचे नाव आहे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आपण दोघे पळून जाऊन लग्न करू असे यादव हा २४ वर्षीय महिलेला वेळोवेळी बोलायचा. तू माझ्याशी फोनवर बोलत जा असे तो विवाहितेला म्हणाला असता तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तु परत आश्वी येथे आली तर मारून टाकेन अशी त्याने धमकीही दिली. तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून शिवीगाळ करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे अधिक तपास करीत आहे. पोलिसांनी यादव यास अटक केले असल्याचे सांगितले आहे.  

Web Title: Sangamner Crime News married woman to run away and get married

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here