राज्यातील हे शहर ओमायक्रॉनच्या सावटाखाली, दोन रुग्ण सापडले
औरंगाबाद | Corona News Update : औरंगाबाद शहरात ओमायक्रॉन विषाणूची लागणझालेले दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती औरंगाबाद महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मांडलेचा यांनी दिली आहे. एक 50 वर्षीय व्यक्ती लंडन वरून भारतात दिनांक १४ डिसेंबर रोजी आले होते. त्यांची मुलगी मुंबई येथे ओमायक्रॉन बाधित आढळून आली आणि मुंबई येथे लीलावती रुग्णालयात तिला भरती केले. तिचे वडील व कुटुंबातील दुसरे सदस्य औरंगाबादला आले व सिल्वर इन हॉटेल येथे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
या दोघांची RTPCR चाचणी केली असता यातील एकाच अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आला आहे. आज दिनांक २५ डिसेंबरला एकाच ओमायक्रोन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे RTPCR चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्या सर्व सदस्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
ओमायक्रॉन बाधित औरंगाबादमधील दुसरी व्यक्ती दुबईहून १७ डिसेंबरला दिल्लीला आली. थंडी व खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने १८ डिसेंबर रोजी त्यांची RTPCR टेस्ट केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. आज त्यांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या कुटुंबातील एकूण तीन व्यक्तींचे नमुने घेतले असून त्यांना मेलट्रोन कोविड हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे.
Web Title: Corona News Update two Patient from Aurangabad