Home Accident News अहमदनगर: सिमेंटचा गोण्या घेऊन जाणारा ट्रक पलटी – Accident

अहमदनगर: सिमेंटचा गोण्या घेऊन जाणारा ट्रक पलटी – Accident

Ahmednagar | Pathardi Accident:  ट्रक खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरच उलटल्याची घटना.

ahmednagar accident-truck-carrying-sacks-of-cement-overturned

पाथर्डी: नगरहून पाथर्डीकडे सिमेंट गोण्या घेऊन जाणारा ट्रक खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरच उलटल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. नगर पाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण विशाखापट्टणम या महामार्गावरील जांबकौडगाव जवळ हा अपघात घडला. या अपघातात जांबकौडगाव येथील दामू भिमाजी खर्से (वय वर्ष 65) हे गंभीर जखमी झाले आहेत.

तसेच या अपघातात ट्रकचे देखील मोठे नुकसान झाले आहे. नगर पाथर्डी हा रस्ता मेहेकरी जांबकौडगाव, मराठवाडी, करंजी, देवराई, तिसगाव, निवडूंगे पर्यंत अतिशय खराब झाला असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवतांना मोटारसायकलस्वरांचा सातत्याने अपघात होत आहे. त्याचबरोबर मोठाली वाहने देखील खड्डे चुकवतांना उलटून त्यांचेही आता अपघात सारखे होत आहेत. या अपघातामुळे जखमींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे.

जांबकौडगाव, मराठवाडी या ठिकाणी महामार्गावर पडलेले खड्डे पाहून अक्षरशः वाहन चालकाच्या मनात धडकी भरते. महामार्गावरील खड्डे डांबर टाकून कधी दुरुस्त करणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. खराब रस्ता व खड्ड्यांमुळे अपघात होऊन मयत अथवा जखमी झालेल्या कुंटुंबाचे भावना तीव्र असून संबंधित ठेकेदाराच्या विरोधात लवकरच जनहित याचिका दाखल करून सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ज्येष्ठनेते बाबा पाटील खर्से, बंटी लांडगे यांनी दिली आहे.

Web Title: ahmednagar accident-truck-carrying-sacks-of-cement-overturned

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here