Home अहमदनगर धक्कादायक! आईनेच पोटच्या मुलीला परपुरुषाशी शारीरिक संबध ठेवण्यास भाग पाडले

धक्कादायक! आईनेच पोटच्या मुलीला परपुरुषाशी शारीरिक संबध ठेवण्यास भाग पाडले

Kopargaon: स्वतः च्या आईने आपल्या अल्पवयीन मुलीस परपुरुषाशी शारीरिक संबंध (Sexual relation) ठेवण्यास भाग पडल्याची संतापजनक घटना.

mother who forced the daughter of Pot to have sexual relations with a foreigner

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील मनेगाव शिवारातून धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतः च्या आईने आपल्या अल्पवयीन मुलीस परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पडल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

तू आता वयात आल्याने आपल्या समाजाची चालीरिती म्हणून तुला परपुरुषाशी संबंध ठेवावे लागेल, असे म्हणून जन्मदात्या आईनेच आपल्या आठवीत शिकणाऱ्या केवळ १३ वर्षे २ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला परपुरुषाशी संबध ठेवण्यास भाग पाडले.

याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी तसेच मुलीच्या आई विरोधात बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अत्याचारित मुलीच्या एका नातेवाईकाने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार,  दि. १ सप्टेबर २०२२ रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तिला सांगितले की तू आता वयात आली आहे. आपल्या समाजाच्या चालीरिती प्रमाणे तुला परपुरुषाशी संबध ठेवावे लागतील. तेव्हा या मुलीने आईला मला शाळा शिकायची आहे, माझे वय नाही, मी असे घाणेरडे काम करणार नाही, असे सांगून तिने आपल्या आईला विरोध केला.

त्यानंतर दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता आमच्या घरी नेहमी येणे जाणे असलेला आबासाहेब रामचंद्र भडांगे, रा. वेस, ता. कोपरगाव हा घरी आला. तेव्हा तिची आई तिला म्हणाली, तुला याचेबरोबर संबंध ठेवावे लागेल. तेव्हा ती घरातून निघून गेली. त्या दोघांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही.

दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे पुन्हा पीडित मुलीच्या घरी आला. त्यावेळी पीडितेची आई पीडित मुलीला म्हणाली, याचेसोबत तुला शरीर संबंध ठेवावे लागेल. त्यास पीडित मुलीने विरोध केला असता पीडिताची आई तिला म्हणाली, आपल्या समाजामध्ये असे करावे लागते, मी सुध्दा हेच केले आहे. तू जर असे केले नाही तर तुझ्याकडे पाहावे लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी आबासाहेब भडांगे याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला तिच्या आईच्या घरातील एका खोलीत घेवून गेला व तिचे इच्छेविरुध्द संबंध (Sexual relation) ठेवले.

आरोपीस पीडिताची आईने संगनमत करुन मदत केली. या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी पीडिताची आई, तसेच आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे यांचे विरुध्द भादंवि कलम ३७६ (२) (१) (जे), ५०६, ३४, बालकांचे लैंगिक शोषणापासून अधिनियम कायदा संरक्षण अधिनियम कलम ४, ६, १६, १७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन्ही आरोपींना राहाता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करत आहेत.

Web Title: mother who forced the daughter of Pot to have sexual relations with a foreigner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here