Home क्राईम संगमनेर शहरातील अमरधाम घोटाळा: दोघा अभियंत्यावर गुन्हा – Crime

संगमनेर शहरातील अमरधाम घोटाळा: दोघा अभियंत्यावर गुन्हा – Crime

Sangamner Crime:  दोघा अभियंत्यांवर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा.

Amardham scam in Sangamner city Two engineers Crime Filed

संगमनेरः शहरातील हिंदू धर्मिय स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी नगरपरिषदेच्या नगरअभियंत्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणीचा अहवाल सादर करणे अपेक्षित असताना थेट निविदा काढून नगरपरिषद आणि शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याचा ठपका ठेवत नगरपरिषदेचे नगर अभियंता राजेंद्र सुतावणे व कनिष्ठ अभियंता सूर्यकांत गवळी या दोघा अभियंत्यांवर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नगरपरिषदेच्या माध्यमातून हिंदू धर्मियांच्या स्मशानभूमीचे सुशोभिकरण व नुतनीकरणाचे काम 2019 मध्ये झालेले असतांनाही त्याच कामासाठी दोन, तीन टप्यात सुमारे 33 लाख रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र काम झालेले असतानाही पुन्हा निविदा काढून या स्मशानभूमीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा ठपका ठेवत भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यानी आंदोलन करून या विषयाचा पाठपुरावा कैला शहर पोलीस ठाण्यात आणि जिल्हाधिकान्यांकडे तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणाबाबतची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करिता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यानी श्रीरामपूर नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना वरील प्रकरणाबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आहवाल जिल्हाधिकारी डॉ भोसले यांना सादर केला होता. त्यातून राजेंद्र सुतावण आणि सूर्यकांत गवळी या दोघांचा या प्रकरणात हेतू स्पष्टपणे समोर आला.

नगरपालिकेच्या या दोन अधिकाऱ्यानी संगनमत करून स्थळ पाहणी अहवाल सादर न करताच थेट निविदा काढत शासनाचीच  फसवणूक केली असल्याचे समोर आले. याबाबत श्रीरामपुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील दोषा अभियंत्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Amardham scam in Sangamner city Two engineers Crime Filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here