Accident: अहमदनगर ब्रेकिंग: ट्रकने दुचाकीला चिरडले, दोन ठार
Ahmednagar | अहमदनगर: नगर-मनमाड रोडवरील पत्रकार चौकात ट्रकने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली. या अपघातात (Accident) दुचाकीवरील दोघे ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज दुपारी ही घटना घडली.
उद्धव तेलोरे व बाळकृष्ण तेलोरे अशी मयतांची नावे आहेत. दुचाकीवरील मयत हे पाथर्डी तालुक्यातील असल्याचे समजते. नगरच्या दिशेने येणार्या मालट्रकने दुचाकीला पत्रकार चौकात धडक दिली. दुचाकीवरील असलेल्या दोघांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तोफखाना, शहर वाहतुक शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.
Web Title: Ahmednagar Accident truck crushed the two-wheeler, killing two