Suicide: सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन तरुणाची जंगलात आत्महत्या
Parner | पारनेर: पारनेर तालुक्यातील हंगा शहाजापुर रोडच्या जंगलात एका २० वर्षीय युवकाने फाशी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. संजय सुखदेव पवार (रायतळे ता. पारनेर) असं या तरुणाचं नाव आहे. संजयने आत्महत्या करण्याअगोदर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला.
याबाबत रामदास नामदेव साळुके (रा.रायतळे ता.पारनेर) संजय पवार याने इंन्स्टाग्रांम अकाउंटवर मी फाशी घेणार आहे असा व्हिडीओ टाकला असल्याची माहिती सुपा पोलिसांना दिली. सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन तात्काळ कारवाई केली .
पो.हे.काँ. ओहळ यांनी तक्रार नोंदवून शोध घेतला असता हंगा शहाजापुर रोडवरील जंगलात संजय पवार याने फाशी घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तराय तपासणीसाठी पारनेर ग्रांमीण रुग्णालयात पाठवला. या युवकाने नैराश्यातुन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाजसमोर आला आहे. अधिक तपास सुपा पोलिस करत आहे.
Web Title: Young man commits suicide in forest by posting video on social media