Home क्राईम व्हिडिओ व फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

व्हिडिओ व फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

Video and photo of a woman sexually abusing to go viral on WhatsApp

Jalgaon News | जळगाव: घुमावल बुद्रुक (ता. चोपडा) येथील २५ वर्षीय विवाहित तरुणीस तिच्या राहत्या घरात घुसून व्हिडिओ कॉल करत हे व्हिडिओ व फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार (sexually abusing) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या २५ व २७ मार्चला रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम पाटील व प्रफुल्ल पाटील (दोघे रा. घुमावल बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. २५) शुभम पाटील याने पीडित महिला घरात एकटी असताना अनधिकृतपणे स्वयंपाकघरात प्रवेश केला. त्यानंतर तोंड दाबून व्हिडिओ कॉल करून व्हिडिओ व फोटो काढले व ते व्हॉट्सॲपवर टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शरीरसंबंध (sexual relation) प्रस्थापित केले. तसेच, रविवारी (ता. २७) देखील सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शुभम व प्रफुल्ल पाटील यांनी पुन्हा त्याच पद्धतीने स्वयंपाकघरात घुसून लज्जास्पद गैरकृत्य केले. यावेळी पीडित महिलेने आरडाओरड केल्याने दोघे जण पळून गेले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Video and photo of a woman sexually abusing to go viral on WhatsApp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here