Home अहमदनगर Fire: वीजेची तार तुटुन ट्रेलरसह तीन बैलगाड्या जळुन खाक

Fire: वीजेची तार तुटुन ट्रेलरसह तीन बैलगाड्या जळुन खाक

 Fire Three bullock carts with broken power lines and trailers were burnt

Parner | टाकळीभान: उसाच्या स्थळातून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रालीला वीज प्रवाह सुरु असणाऱ्या दोन तारा तुटून तारांचे घर्षण होवुन वीजेचा लोळ खाली पडून पाचरटाने पेट घेतल्याने आगीचा (fire) डोंब उसळून ऊस घेवुन जाणारी भरलेली ट्राॅली उसाच्या स्थळात सोडलेल्या तीन बैलगाड्या आगीच्या भक्षस्थानी पडुन जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे. मदतकार्य करणाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.

टाकळीभान शिवारातील जगताप वस्ती परीसरातील गट नंबर ३२४ मध्ये भाजपाचे मुकुंद राजाराम हापसे यांची ऊसाची शेती आहे. सध्या या उसाची तोडणी अंतिम टप्यात सुरु आहे. शेवटच्या टप्यातील ऊसतोडणी करुन ऊसाची शेवटची ट्रीप भरुन ट्रॅक्टर दोन ट्राॅल्या घेवुन उसाच्या थळाच्या बाहेर निघत होता. माञ लोंबकळलेली वीजेची तार ऊस भरलेल्या ट्रेलरच्या डांबाला अडकल्याने तार तुटली. त्यामुळे तारेला तार लागुन घर्षण झाल्याने आगीचा मोठा लोळ खाली पाचरटात पडला.यामुळे काही क्षणात आगीचा डोंब उसळला व आगीने क्षणात रौद्र रुप धारण केले. ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान राखुन आग लागलेली ट्राॅली तेथेच सोडुन ट्रॅक्टर व एक ट्राॅली घेवुन उसाच्या थळाच्या बाहेर आला. याच ठिकाणी ऊसतोडणी मजुरांच्या बैलगाड्या सोडलेल्या होत्या. आगीवर नियंञण मिळवता मिळवता तीन रीकाम्या बैलगाड्याही जळुन खाक झाल्या.

Web Title: Fire Three bullock carts with broken power lines and trailers were burnt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here