Home अकोले संगमनेर तालुक्यातील तरुणाचा अकोलेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संगमनेर तालुक्यातील तरुणाचा अकोलेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Youth from Sangamner taluka sexually abuses a minor girl in Akole

Sangamner Crime | संगमनेर: सोशियल मेडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत व लग्नाचे आमिष दाखवत अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील एका १७ वर्षीय मुलीवर संगमनेर तालुक्यातील एका युवकाने वारंवार अत्याचार (sexually abuses) केल्याची घटना घडली आहे. तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याचे व तिच्या भावाचे अपहरण करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

लखन अशोक राजपूत रा. आश्वी ता. संगमनेर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. अकोले तालुक्याच्या ग्रामीण भागातील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी संगमनेरातील एका उपनगरात राहते. जुलै २०२१ मध्ये सोशियल मेडियाच्या माध्यमातून तिची लाखान राजपूत या तरुणाशी मैत्री झाली. त्याने लग्नाचे आमिष दाखविले. तिला कोपरगाव, संगमनेर येथील लॉजवर आणि त्याच्या घरी नेऊन वारंवार अत्याचार केले. मला तुझ्यावर विश्वास नाही. मी जे सांगेल ते तू कर तरच माझा तुझ्यावर विश्वास राहील असे म्हणत मुलीला तिच्या मनगटावर, मांडीवर, छातीवर बेल्ड मारून दुखापत करण्यास भाग पडले. सदर प्रकार पिडीत मुलीने तिच्या घरी सांगितला. त्यानंतर राजपूत याने आपण पळून जाऊन लग्न करू व तुला माझ्या सोबत लग्न करावेच लागेल नाही तर तुझे फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या भावाचे अपहरण करेन अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार जुलै २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान घडला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.    

Web Title: Youth from Sangamner taluka sexually abuses a minor girl in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here