Home Accident News Accident: दुचाकींवर जात असताना दोन मित्रांना टँकरने धडक, एक ठार, एक जखमी

Accident: दुचाकींवर जात असताना दोन मित्रांना टँकरने धडक, एक ठार, एक जखमी

Ahmednagar Accident Two friends were hit by a tanker while riding a bike one death

Ahmednagar | अहमदनगर: कॉलेजला दुचाकीवर जात असणाऱ्या दोन मित्रांना टँकरने धडक दिल्याने अपघात (Accident) होऊन या धडकेत गोपाल अभिमन्यु सोनवणे (रा. शेंडगाव ता. श्रीगोंदा) याचा मृत्यू झाला आहे तर सुयोग शिवाजी शेळके (वय 21 रा. जुने दहिफळ ता. शेवगाव) हा जखमी झाला आहे. अहमदनगर शहरातील कोठी चौकातून जात असताना हा अपघात (Accident) घडला.

गोपाल व सुयोग हे दोघे मित्र कोठी चौकाकडून मार्केट यार्ड मार्ग आनंदधामकडे जात असताना कोठी चौकाजवळ पाठीमागून येणार्‍या टँकरवरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील टँकरची धडक दुचाकीला दिली.

या धडकेत जखमी झालेल्या गोपाल व सुयोग यांना अहमदनगरमधील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील गोपालचा मृत्यू झाला आहे. याबाबत जखमी सुयोग शेळके याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टँकर चालकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar Accident Two friends were hit by a tanker while riding a bike one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here